‘अल-खैर’ मायनॉरिटी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ‘सेल्फी विथ तिरंगा’ कार्यक्रम उत्साहात!
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२२ । शहरातील शिवाजीनगर भागातील आरसी वाला कॉलनी येथे स्वतंत्रताच्या अमृत वर्ष महोत्सव निमित्त केंद्र सरकारच्या सेल्फी विथ तिरंगा या कार्यक्रमांतर्गत “अल-खैर” मायनॉरिटी चॅरिटेबल ट्रस्ट व आरसी वाला कॉलनी परिसरात नागरिकांचा संयुक्त विद्यमानाने “”सेल्फी विथ तिरंगा”” कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिकलकर बिरादरी’चे अनवर खान शिकलकर व प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका गायत्री शिंदे, शिवसेनेचे अल्पसंख्याक सेलचे महानगर अध्यक्ष माजी नगरसेवक जाकीर पठान, मानव अधिकाराचे जावेद शेख, सुफी फाउंडेशनचे हाजी शाकीर खाटिक हे होते,,
कार्यक्रमाची सुरुवात याहिया अल्ताफ शेख या बालकाचा पवित्र कुराण पाटलाने व अ. हमीद शेख रिटायर पोलीस निरीक्षक, जिल्हा पोलीस यांच्या हस्ते सेल्फी फ्रेमची फीत कापून करण्यात आली. कार्यक्रमात ट्रस्ट व कॉलनी तर्फे जळगाव महानगरपालिका चे सफाई अधिकारी बेंडवाल, मुकरदम दिलीप तायडे, पाणीपुरवठा कर्मचारी सलीम शेख, चव्हाण तसेच विद्युत पुरवठा अभियंता इंगळे यांचा शिवाजीनगर भागात नागरिकांना अतिशय चांगल्या प्रकारे सेवा दिल्याबद्दल मान्यवरांचा हस्त सत्कार करण्यात आला. कॉलनीतील रहिवासी मेजर रफिक शेख रिटायर्ड SRP इंडियन आर्मी व अ. हमीद रिटायर पोलीस कर्मचारी यांचाही देशसेवा आणि बलिदान देण्यासाठी अल खैर ट्रस्ट तर्फे मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन (सत्कार) करण्यात आले.
दरम्यान, मेजर रफिक शेख यांनी देश सेवेसाठी युवकांनी आर्मी मध्ये भरती व्हावे, असे आव्हान केले. अल खैर ट्रस्ट चे अध्यक्ष युसुफ शाह यांनी एकतेचे महत्व पटवून दिले व आई वडिलांनी आपल्या मुलांना देशासाठी बलिदान दिलेल्या क्रांतिवीरांचा इतिहास सांगावा व आपण स्वतः आणि मुलांनाही देशासाठी बलिदान देण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. असे आवाहन केले. प्रा. रफिक शेख सर यांनी देशभक्तीवर शेर शायरीने उपस्थांची मने जिंकली त्यात प्रामुख्याने “हमारी आन बनता है, हमारी जान बनता है, लहू जब सब का मिलता है, हिंदुस्तान बनता है..!” हा शेर दात मिळून गेला. अल हिंद ट्रस्टचे अध्यक्ष अल्ताफ शेख, मानवधिकराचे जावेद शेख व हजरत बिलाल चे सय्यद अकील पैलवान यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. रफिक शेख, अल खैर ट्रस्ट चे युसुफ शाह, जोयेब खाटीक, फरहान शेख, इंजिनिअर शोहेब भाई, आरीफ, सद्दाम शाह व कॉलनीतील युकांनी परिश्रम घेतले.