जळगाव जिल्हा

रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या मुंबई महिला संघटक प्रमुख पदी सुषमा अत्तरदे यांची निवड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । रुग्ण हक्क संघर्ष समिती प्रमुख ॲड विजयभाऊ पंडित यांच्या अध्यक्षतेखाली रुग्ण हक्क च्या पुणे शहर कार्यालयात २० जुलै रोजी पुणे महिला प्रमुख मिनाक्षीताई शेटे यांच्या उपस्थित बैठक घेण्यात आली.

यावेळी किरण पाचपांडे यांनी सुचवलेल्या रुग्ण हक्क संघर्ष समिती चे सदस्या सामाजिक क्षेत्रात व सेवाभावी संस्थाच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून कार्यरत असणारे विविध समाज हितार्थ उपक्रम राबविणारे व सामाजिक क्षेत्रातील त्यांची आवड पाहून सौ. सुषमा शांताराम अत्तरदे यांची मुंबई महिला संघटक प्रमुख पदी निवड करण्यात आली.

यावेळी मुंबई विभागीय प्रमुख प्रशांत ढोणे, अंबरनाथ महिला तालुकाध्यक्षा सुजाता गायकवाड, संस्थापक सचिव विश्वासजी कुलकर्णी, सह सचिव संतोष सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संघटक किरण बडे, महिला जिल्हाध्यक्षा सौ मंगल अशोक जाधव, व पिंपरी चिंचवड शहराध्यक्षा सौ माधुरी कोलते, उपाध्यक्षा किरण पाचपांडे, पुणे शहराध्यक्ष संजय बावळेकर, गायत्री देभे, कल्पना जाधव, मनिषा आगळे , कल्पना जाधव, राहुल ताटे, विशाल जाधव, रमजान मुलाणी, शशांक घाडगे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button