रायसोनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय कंपनीत निवड
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२१ । रायसोनी बिजनेस मॅनजमेट महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने आयोजीत केलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत कोग्निझेंट, एक्सेचर, हिताची या साॅफ्टवेअर क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने १२ विद्यार्थ्यांची आकर्षक पगारावर नोकऱ्यांसाठी निवड केली आहे, ही माहिती रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयातील मॅकेनिकल अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. डॉ. दिपेन कुमार रजक यांनी दिली आहे.
निवड झालेले निकिता चौधरी, ऋतुजा कुंभार, निखील भांडारकर, कौस्तुभ सोनगिरे, शुभम पाटील, हर्षल सोनार, दुर्गेश पाटील, हर्षल बारी, हर्षल चंदाने, रामेश्वर भरणे, ललित पाटील, भावेश राणे यांच्या रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितम रायसोनी व संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच विभाग प्रमुख प्रा.डॉ.दिपेन कुमार रजक, प्रा.वसिम पटेल, प्रा.अविनाश पांचाळ, प्रा.शिवजी कुमार, प्रा.जितेंद्र वढोदकर, प्रा.सौरभ गुप्ता, प्रा.अमोल जोशी यांनी निवड झालेल्या निकिता चौधरी, ऋतुजा कुंभार, निखील भांडारकर, कौस्तुभ सोनगिरे, शुभम पाटील, हर्षल सोनार, दुर्गेश पाटील, हर्षल बारी, हर्षल चंदाने, रामेश्वर भरणे, ललित पाटील, भावेश राणे यांचा सत्कार केला.