जळगाव जिल्हाभुसावळ

कृषी जागरूकता उपक्रमासाठी आदर्शगाव म्हणून फुलगावाची निवड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२२ । कृषी उपक्रमासाठी गावातील नैसर्गिक परीस्थितीचा अभ्यास करण्याकरीता, शेतकर्‍यांच्या समस्या ओळखण्यासाठी आणि नवीन कृषी तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी तसेच कृषी आणि ग्रामीण विकासाशी संबंधित विविध योजनांचा अभ्यास करण्यासाठी कृषिकन्या फुलगावात दाखल झाल्या आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत असलेले शासकीय कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे अंतिम वर्षात शिकत असलेल्या कृषिकन्या म्हस्के प्राजक्ता, माने रोहिणी, सृष्टी तांबे, प्रज्ञा सपकाळे, विशाखा डोंगरे यांच्यासाठी ग्रामीण कृषि जागरुकता आणि कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम या उपक्रमासाठी फुलगाव या गावाची निवड करण्यात आली आहे.

ग्रामीण कृषी जागरुकता या उपक्रमाला मान्यता देऊन कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर येथील महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत कार्यक्रम समन्वयक यु.एस. बोंदर, चेअरमन डी.बी.कदम, विषयतज्ञ ए.एन.म्हेत्रे, एस.एस. बंड, टी.आर.भोसले, के.पी.ढाके यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिकन्या शेतकर्‍यांची संवाद साधत आहेत. ग्रामपंचायत कार्यालयास कृषिकन्यांनी भेट देऊन सरपंच वैशाली टाकोळे, उपसरपंच राजेंद्र चौधरी (राजकुमार), कृषी सहाय्यक अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व महिला बचत गटाच्या कृषीसखी यांच्याशी ग्रामीण कृषी जागरुकता या उपक्रमाच्या उद्दिष्टांवर दृश्य सादरीकरणाद्वारे संवाद साधला.

Related Articles

Back to top button