राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेसाठी जळगावच्या पाच विद्यार्थ्यांची निवड
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२२ । जळगाव जिल्हा बुद्धीबळ संघटनेतर्फे १० व १८ वर्ष वयोगटातील मुले आणि मुलींच्या निवड चाचणी स्पर्धाचे आयोजन कांताई सभागृह येथे करण्यात आले. ज्यात २७ विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या दोन्ही वयोगटातुन मुले आणि मुलीं मधून प्रत्येकी दोन खेळाडूंची निवड राज्य स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. १० वर्षे वयोगटातील स्पर्धा या १४ व १५ एप्रिल रोजी कोल्हापूर येथे तर १८ वर्षे वयोगटातील स्पर्धा १ ते ३ एप्रिल रोजी सांगली येथे होत आहे.
प्रत्येक गटातील निवड झालेल्या खेळाडूंना जिल्हा संघटनेतर्फे ट्रॉफी व पुस्तक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र बुद्धीबळ संघटनेचे खजिनदार तथा जळगाव जिल्हा बुद्धीबळ संघटनेचे उपाध्यक्ष फारुक शेख होते तर प्रमुख अतिथी म्हणून संघटनेचे सचिव नंदलाल गादिया, आयुर्विमा महामंडळाचे चंद्रशेखर देशमुख, जैन स्पोर्टस अकडमी चे अरविंद देशमुख व स्पर्धेचे मुख्य पंच प्रवीण ठाकरे हे होते.
राज्य स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू
१० वर्षे वयोगट : तसीन तडवी, आरुष सरोदे
१८ वर्षे वयोगट : सानिया तडवी, मितेश जेठवा, श्रेयस उपासनी
उत्तेजनार्थ बक्षिस मिळवणारे खेळाडू : शिवराज वाघ, श्लोक बोरसे, नैतिक मुनोत, हर्षल खामकर, संस्कार पवार, जयेश सपकाळे, आयुष गुजराथी, सोहम बढे
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रवीण ठाकरे यांनी केले तर परेश देशपांडे यांनी आभार मानले.
पंच म्हणून प्रवीण ठाकरे,परेश देशपांडे, व भारत आमले यांनी काम पाहिले