जळगाव लाईव्ह न्यूज । यावल तालुक्यातील न्हावी ते बोरखेडा जाणाऱ्या रस्त्यावर गोवंश वाहतूक करणारे वाहन फैजपूर पोलिसांनी पकडले. गोवंश वाहनसह पाच लाख ८० हजाराचा मुद्देमाल हस्तगत करून गोवंशाची सुटका करण्यात आली असून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, न्हावी ते बोरखेडा या रस्त्यावर खंडेराव महाराजांचे मंदिर आहे. या मंदिराच्या जवळून महेंद्रा पिकअप वाहन क्रमांक एमएच ०४ इएल-६५२३ यातून गोवंश वाहतूक केले जात होते. चार गोवंश या वाहनात होते. याची माहिती फैजपूर पोलिसांना मिळाली. या वाहनातून चार गोवंश ताब्यात घेतले व त्यांची सुटका केली.
वाहन आणि गोवंश असा ५ लाख ८० हजार चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला व या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार योगेश दुसाने यांच्या फिर्यादीवरून रमजान नबाब तडवी, सलमान शेख फरीद, दोघे रा. पाल ता. रावेर आणि मॅक्स पिकअप वरील अज्ञात चालक अशा तीन जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद गाभणे करत आहे.