जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२४ । लाचखोरीचे प्रमाण काही केल्या कमी होताना दिसत नसून अशातच जळगाव जिल्ह्यातून लाचखोरीची आणखी एक प्रकार समोर आला आहे. विद्यालयात शिपाईच्या रिक्तपदाव नोकरी लावून देण्याच्या मोबदल्यात १० लाखांची मागणी करत पहिला हप्ता म्हणून २ लाखांची रक्कम स्विकारतांना संस्थेच्या सचिवाला जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. विनोद मधुकर चौधरी (वय ५३ रा. शिवकॉलनी, जळगाव) असे लाचखोर सचिवाचे नाव असून या कारवाईने खळबळ उडाली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
नेमका प्रकार काय?
५४ वर्षीय तक्रारदार यांचा मुलगा हा वेदमाता गायत्री बहुउद्देशीय संस्था, पिंप्री खुर्द, ता.धरणगाव जि जळगाव संचलित २० टक्के शासकीय अनुदानित आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, भोद खुर्द शिवार येथे २०२१ पासून अनुसूचित जाती या प्रवर्गातील शिपाई पदावर नोकरीस होता. त्यावेळी संशयीत आरोपी व सचिवांनी ७ लाख ७० हजार रुपये घेतले होते. त्यानंतर तक्रारदार यांच्या मुलास सचिव विनोद चौधरी यांनी तक्रारदाराच्या मुलाला २०१२ पासून कमी केले व ही जागा २०१२ पासुन रिक्त पद दाखवून त्या जागेवर तक्रारदार यांचा भाचा राजेश यास शिपाई पदावर नोकरी लावण्यासाठी व शासनाकडून मंजुरी आणून देण्यासाठी तक्रारदाराकडे १५ ऑक्टोबर रोजी १० लाख रुपये लाच मागितली व त्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली. तत्काळ दोन लाख रुपये व शासनाकडून मंजुरी प्राप्त झाल्यावर तीन लाख रुपये व पहिला पगार सुरू झाल्यावर पाच लाख रुपये असे टप्प्या-टप्प्याने 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली तसेच यापूर्वी दिलेले सात लाख 70 हजार रुपये विसरून जा, असे सांगण्यात आले.
आताच्या कामासाठी १० लाखांपैकी महिला हप्ता म्हणून २ लाखांची मागणी केली. त्यानुसार तक्रारदार यांनी याबाबत जळगाव लाचलुचपत विभागाला तक्रार दिली. पथकाना पळताळणीसाठी आज गुरूवारी १७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता सचिव विनोद चौधरी यांच्या शिवकॉलनी येथील राहत्या घराजवळ सापळा रचून २ लाखांची लाच स्विकारतांना रंगेहात पकडले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.