लाचखोरांवर कारवाईत जळगाव जिल्हा विभागात दुसरा
जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२२ । जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वर्षभरात एकूण ३३ लाचखोरांवर कारवाई केली. लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईत नाशिक विभागात जळगाव दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. यंदाही लाचखोरीत पोलिस, जिल्हा परिषद व महसूल विभागातील लाचखोर अव्वल स्थानी आहेत.
१ जानेवारी ते २८ डिसेंबर या कालावधीत नाशिक एसीबीने ४० लाचखोरांवर कारवाई केली. कारवाईमध्ये सन २०२० च्या तुलनेत १५ लाचखोरांवरील कारवाईने वाढ झाली. जळगाव एसीबीने ३३ लाचखोरांवर कारवाई केली. सन २०२० च्या तुलनेत त्यामध्ये १३ने वाढ नोंदवण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातही ३३ लाचखोरांवर कारवाई झाली.
सन २०२० मध्ये झालेल्या कारवाईच्या तुलनेत त्यामध्ये केवळ एका कारवाईची भर पडली. जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक पोलिस विभागातील ९ लाचखोरांवर कारवाई झाली. महसूल व पोलिस विभागातील प्रत्येकी ३ लाचखोरांवर कारवाई झाली. सार्वजनिक बांधकाम, एमएसइबी,आरोग्य व उपप्रादेशिक परिवहन विभागातील प्रत्येकी २ लाचखोरांवर कारवाई झाली. उर्वरित नऊ विभागातील प्रत्येकी एका लाचखोरांवर कारवाई झाली.
हे देखील वाचा :
- गिरणा पाटचारीत उडी घेऊन तरुणाची आत्महत्या
- 1 रुपयात मिळणार पिकविमा होणार बंद? जळगावात आढळले तब्बल ‘एवढे’ बोगस अर्ज
- डॉ. केतकी पाटील निर्मित संविधान@७५ दिनदर्शिकेचे केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंकडून कौतुक
- सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये जम्बो भरती; ग्रॅज्युएट्स उमेदवारांना नोकरीची संधी, पगार 85920
- Jalgaon : अॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी बनविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन