⁠ 
शनिवार, मे 4, 2024

यंदा तीन महिने सरासरीपेक्षा अधिक तापमान, तीन दिवसांनी पारा चाळीशी ओलांडणार

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मार्च २०२२ । उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे यंदा महाराष्ट्रात थंडी नेहमीपेक्षा अधिक राहिली. त्याचप्रमाणे मार्च ते मे हे तीन महिने कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याने राज्यात तीन महिने अधिक उकाड्याचा सामना करावा लागणार आहे.

भारतीय हवामान विभागाने मार्च ते मे या तीन महिन्यांपर्यंतचा अंदाज जाहीर केला आहे. यामध्ये या तीन महिन्यांमध्ये उन्हाची तीव्रता अधिक असल्याने किमान आणि कमाल तापमानात सरासरीपेक्षा ४५ ते ५० टक्के अधिक राहणार आहे.

दरम्यान, मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यासह विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात किमान तापमान हे सरासरीपेक्षा ५० टक्केपेक्षा जास्त राहणार आहे. तर मुंबई, कोकण या तीन महिन्यांतील किमान तापमान हे सरासरीपेक्षा जास्त ७५ टक्के राहणार आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंशांपुढे गेले आहे. येत्या रविवारनंतर पारा ४० अंशांपुढे जाण्याची शक्यता आहे.