⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | नोकरी संधी | बेरोजगार तरुणांनो संधी सोडू नका! सरकारी कंपनीत 8 वी पाससाठी बंपर भरती, असा करा अर्ज

बेरोजगार तरुणांनो संधी सोडू नका! सरकारी कंपनीत 8 वी पाससाठी बंपर भरती, असा करा अर्ज

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२२ । आठवी उत्तीर्ण झाल्यानंतर सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खूशखबर आहे. South Eastern Coalfields Limited ने विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 23 मे 2022 पर्यंत अर्ज करू शकतात.उमेदवारांनी या पदांसाठी फक्त नोंदणीकृत पोस्टद्वारे अर्ज करावा लागेल.

एकूण पदसंख्या : ४००

रिक्त पदांची संख्या :

डंपर ऑपरेटर – 355 पदे
डोझर ऑपरेटर – ६४ पदे
लोडर ऑपरेटर – २१ पदे

शैक्षणिक पात्रता :

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला आठवी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. तसेच, उमेदवाराकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार शैक्षणिक पात्रता, वय यासंबंधी तपशीलवार माहितीसाठी अधिकृत वेबसाइट secl-cil.in वर जारी केलेली अधिसूचना पाहू शकतात.

निवड प्रक्रिया
या पदांसाठी उमेदवारांची निवड ट्रेड टेस्टद्वारे केली जाईल. ज्याच्या तारखा वेबसाइटवर नंतर शेअर केल्या जातील.

महत्वाच्या तारखा
अर्ज सुरू करण्याची तारीख – 2 मे 2022
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख- 23 मे 2022
मेलद्वारे अर्जाची प्रत जमा करण्याची शेवटची तारीख – 30 मे 2022

अधिकृत संकेतस्थळ : secl-cil.in

Notification : Download Here

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.