जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जुलै २०२४ । भुसावळ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नर्सरीत शिकणाऱ्या साडेतीन वर्षीय चिमुकलीवर स्कूल व्हॅन चालकाने गैरकृत्या केल्याचा संताप जनक प्रकार समोर आला आहे.
शाळेच्या बाहेर स्कूल व्हॅन मध्ये चिमुकलीला बसवून हे संताप जनक कृत्य केले असून चिमुकली घरी आल्यानंतर पालकांच्या हा प्रकार लक्षात आल्याने पालकांनी तात्काळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला धाव घेतली, दरम्यान पोलिसांनी संशयित स्कूल व्हॅन चालक प्रसाद हिरामण चौधरी यास अटक करून त्याचे विरुद्ध पोस्कोसह ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल केला आहे.