आदेश निघाला! आजपासून जळगाव जिल्ह्यातील शाळांच्या वेळा बदलल्या, असं असणार नवीन वेळापत्रक?

मार्च 27, 2026 10:54 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । वाढत्या उन्हाच्या तीव्रतेचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व प्राथमिक शाळा आणि हायस्कूल आता सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी जारी केले आहेत.

school time

नवीन वेळापत्रकानुसार शाळा सकाळी ७:०० ते ११:४५ या वेळेत चालणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी आज शुक्रवारपासून करण्यात येणार असून सर्व शाळांनी तत्काळ नवीन वेळापत्रक लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, आदेशाची अंमलबजावणी करण्यात कोणतीही दिरंगाई अथवा दुर्लक्ष झाल्यास संबंधित शाळेचे मुख्याध्यापक आणि गटशिक्षणाधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now