वाणिज्य

SBI खातेदारांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! SBI ने बजावली ही नोटीस, वेळीच बघा अन्यथा होईल पश्चाताप

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२२ । आजच्या ऑनलाइन युगात बँकिंग क्षेत्रही मोबाईलवर अवलंबून झाले आहे. सर्वात मोठा व्यवहार असो किंवा घरबसल्या खरेदी असो, आता सर्व काही मोबाईलवर होते. अशा काळात सायबर फसवणुकीचा धोकाही मोठ्या प्रमाणात वाढतो.

ऑनलाइनच्या जमान्यात अशा लोकांपासून सावध राहा
अनेक फसवणूक करणारे लोक बँकर असल्याचे भासवून ग्राहकांना फोन करतात. यानंतर त्यांना आमिष दाखवून ओटीपी वगैरे मागतात. अशा प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या करोडो ग्राहकांना सतर्क केले आहे.

OTP शेअर करू नका :
SBI ने नुकतेच एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये बँकेने आपल्या करोडो ग्राहकांना सावध केले आहे. एसबीआयच्या अधिकृत ट्विटर हँडलने ट्विट केले आहे की, ‘कोणतीही गोष्ट शेअर करताना काळजी घ्यावी. पण जेव्हा OTP येतो तेव्हा तो कधीही इतर कोणाशीही शेअर करू नये. SBI ही जुनी सरकारी बँक आहे. सध्या देशभरात स्टेट बँक ऑफ इंडियाचे ४५ कोटींहून अधिक ग्राहक आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button