⁠ 
बुधवार, मे 8, 2024

NTPC CBT परीक्षेची बनावट नोटीस व्हायरल, रेल्वेने उमेदवारांना दिला ‘हा ‘इशारा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२२ । भारतीय रेल्वेच्या RRB NTPC CBT 2 परीक्षेसंदर्भात एक नोटीस सध्या खूप व्हायरल होत आहे. मात्र, व्हायरल ही नोटीस पूर्णपणे बनावट आहे. रेल्वेने अद्याप अशी कोणतीही नोटीस बजावलेली नाही. रेल्वेने उमेदवारांना खोट्या नोटिसांवर विश्वास न ठेवण्याचा असा इशारा दिला आहे.

CBT-2 चे बनावट डेटशीट व्हायरल
या बनावट नोटीसमध्ये असे लिहिले आहे की CBT-2 साठी वेतन स्तर 5, 3 आणि 2 पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना 19, 20 मे आणि 14-16 जून 2022 रोजी परीक्षेला बसावे लागेल. तर रेल्वे भरती बोर्डाने अशी कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.

रेल्वे मंत्रालयाने ट्विट करून माहिती दिली
ट्विटद्वारे उमेदवारांना सावध करत मंत्रालयाने लिहिले की, ‘रेल्वे भर्ती बोर्डाच्या CBT-2 बाबत बनावट नोटिसा प्रसारित केल्या जात आहेत. अशी कोणतीही नोटीस रेल्वेकडून जारी करण्यात आलेली नाही. उमेदवारांनी सावधगिरी बाळगा आणि अशा बनावट दाव्यांपासून सावध रहा.

रेल्वेने आधीच योग्य तारीखपत्रक जारी केले आहे
NTPC लेव्हल-4 आणि लेव्हल-6 च्या पदांसाठी CBT-2 परीक्षा 9 मे आणि 10 मे 2022 रोजी होणार आहे. RRB लेव्हल-4 आणि लेव्हल-6 उमेदवार वेबसाइटला भेट देऊन तपासू शकतात. याशिवाय RRB ने CBT-2 साठी स्कोअर कार्ड लिंक, मॉक टेस्ट लिंक आणि हेल्पडेस्क लिंक देखील जारी केली आहे.

CBT-2 चे प्रवेशपत्र देखील परीक्षेच्या काही दिवस आधी जारी केले जाईल. लेव्हल-2, लेव्हल-3 आणि लेव्हल-5 पदांसाठी CBT-2 चे वेळापत्रक नंतर प्रसिद्ध केले जाईल. पुरेशा दिवसांचे अंतर देऊन, इतर वेतन-स्तरांचा दुसरा टप्पा CBT आयोजित केला जाईल.