सावदा पोलिसांचा धाक संपला, कुंभारखेडा शिवारात शेतकऱ्याचे केळीचे घड कापले

मार्च 7, 2022 6:34 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२२ । चिनावल परिसरात वारंवार शेतमाल नुकसान करण्याऱ्या चोरट्यांचा शोध लागत नसताना आज सोमवारी रात्री पुन्हा चोरट्यांनी डोकं वर काढत कुंभारखेडा शिवारातील एका शेतकऱ्याचे पंचवीस ते तीस केळीचे घड कापत नुकसान केल्याचे समोर आले आहे. मात्र, या पंधरवड्यात ही सहावी घटना असून अद्यापही चोरट्यांचा शोध न लागल्याने सावदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

banana

पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखांना चौकशीचे आदेश दिले असतानाही या समाज कंटकांचा शोध लागत नसल्याने शेतकरी मोठे संतप्त झाले आहे. एका प्रकारे या भागात या समाजकंटकांचे मोठी दहशत पसरली असून जीवित हानी देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेळीच पोलिसांनी या चोरट्यांचा शोध घेऊन कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत परिसरातील शेतकरी व्यक्त करत आहे.

घड कापणाऱ्या समाजकंटकांकडून संदेश रुपी चिठी

कुंभारखेडा शिवारात अनिल पाटील यांच्या शेतात कापलेल्या घरांसोबत पोलिसांना एक चिठ्ठी सापडली असून त्या चिठ्ठीत स्थानिक लोकांना कामाला सांगा अन्यथा अशाच प्रकारे शेतमालाचे नुकसान करत राहणार व शिवीगाळ करत चिठ्ठी एका खोडाला लावून ठेवली आहे यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात भयभीत झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now