⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | कासोदा पोलीस स्टेशन येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात

कासोदा पोलीस स्टेशन येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जानेवारी २०२२ । कासोदा येथील पोलीस स्टेशनात जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा अभियानातंर्गत स्रियांसाठी साक्षरतेची वाट प्रकाश मान करणाऱ्या क्रांतीज्योती, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सपोनि.निता कायटे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या प्रसंगी साधना मा.व उ.विद्यालाय, सार्वजनिक मा.विद्यालाय, शहेजादी उर्दू हायस्कूल, ए.टी.डी.उर्दू हायस्कूल व जि.प.उर्दू स्कूल कासोदा या शाळेतील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

दरम्यान, सपोनी नीता कायटे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल व आपण स्वतः कश्या पद्धतीने शिक्षण घेऊन आज या पदावर महिला अधिकारी म्हणून ठाम पणे कार्यकरत आहे अशी माहिती दिली. पीएसआय नरेश ठाकरे व साधना विद्यालयाचे प्रा.जि. के.सावंत यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल माहिती देत आपलेविचार व्यक्त केले. तर पोहेकॉ. नंदलाल पाटील यांनी पोलीस ठाण्यातील शास्रे, (वेफन) या बद्दल आलेल्या विद्यार्थीनींना माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधना शाळेचे उपशिक्षक बी.जे.बेडसे सर यांनी केले तर आभार साधना ज्यु. कॉलेज चे प्राध्यापक पि. एल.थोरात सर यांनी मानले.

तसेच कासोदा पो.स्टे. मध्ये असा कार्यक्रम पहिल्यांदाच घेण्यात आल्याने सर्वच शाळेच्या शिक्षकांनी व विद्यार्थीनींनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमा प्रसंगी सा.मा.वी.चे प्रा.सावंत, उपशिक्षक बी.जे.बेडसे, उपशिक्षक पी.एल.मोरे, प्रा.पी.एल.थोरात, प्रा.जे.एम.आहिरे, सार्वजनिक वि.चे पि.के.पाटील व उर्दू हायस्कूल चे शिक्षक उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी पोलीस स्टेशनच्या महिला अधिकारी सपोनि.नीता कायटे, पीएसआय नरेश ठाकरे, यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पो.कॉ.सविता पाटील, स.फौ.बडगुजर, स.फौ. भागवत पाटील, पो.कॉ.इम्रान पठाण, पो.कॉ.प्रविण हटकर, पो.कॉ.स्वप्नील परदेशी, पो.ना.अमृत पाटील, चालक पोहेकॉ.मनोज पाटील, पो.कॉ.समाधान तोंडे आदींनी परिश्रम घेतले.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह