कोरपावली येथे विद्यार्थ्यांचे सरपंचानी केले स्वागत
जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । कोरपावली ( ता. यावल ) येथे शाळा सुरु झाल्या. असून जिल्हा परिषद शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षकांना पुष्पगुच्छ व विद्यार्थ्यांना चॉकलेट देऊन सरपंच विलास अडकमोल यांनी स्वागत केले.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जवळजवळ गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या प्राथमिक शाळा राज्य शासन व शिक्षण विभागाने सुरु केल्या आहे. यावल तालुक्यातील कोरपावली येथील १ ते ७ वी पर्यंतच्या शाळा झाल्या. जिल्हा परिषद शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षक व विदयार्थी यांना पुष्पगुच्छ आणि देऊन चॉकलेट देऊन विध्यार्थ्यांचे स्वागत आणि शिक्षकांचे सरपंच विलास अडकमोल आणि सहकारी यांनी स्वागत केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी सरपंच विलास अडकमोल, माजी सरपंच जलील पटेल, मराठी शाळेचे मुख्याध्यापक धनराज कोळी, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक जावेद तडवी, ग्राप सदस्य सिकंदर तडवी, आरिफ तडवी, शिक्षक जाकीर सर, निवृत्ती भिरुडसर,रमेश काळेसर, तालेब पटेल, नईम पटेल, रिजवान पटेल, तंजील पटेल, अस्लम सर, कतबुद्दीन सर, फिरोज सर, ग्राप कर्मचारी किसन तायडे, सलीम तडवी आदी पालक गावकरी उपस्थित होते