जळगाव जिल्ह्यातील लाखो महिलांसाठी गुडन्यूज ; होळीपूर्वी मिळणार ‘या’ योजनेचा लाभ..

फेब्रुवारी 24, 2025 2:00 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यातील महायुती सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (ladki Bahin Yojana) राबविली जात असून या योजनेद्वारे पात्र उमेदवारांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा केले जात आहे. अतयापर्यंत या योजनेचे आठ महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा झाले असून लवकरच फेब्रुवारीचे पैसे जमा होणार आहे. अशातच सरकारने राज्यातील लाखो महिलांसाठी गुडन्यूज दिली आहे.

ladki bahin

ती म्हणजे राज्याच्या सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागातर्फे अंत्योदय गटातील प्रत्येक शिधापत्रिकाधारक महिलांना मोफत साडी देण्यात येणार आहे. अन्नधान्य पुरवठा विभागाच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील सर्व रेशन दुकानांवर अंत्योदय कार्डधारकांच्या संख्येनुसार साड्या उपलब्ध करून दिल्या जातील.

मागील वर्षीही ही योजना राबवण्यात आली होती. यावर्षीही होळीपूर्वी साडी वाटप होणार आहे. जळगाव जिल्ह्यात १,३५,३०२ साड्यांचे नियतन मंजूर करण्यात आले आहे. साड्या वितरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी काही अटी व शर्तीच्या अधीन राहून मान्यता दिली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड व तहसीलदारांनी या साड्यांची गुणवत्ता व वितरणावेळी तपासणी करायची आहे.

ही योजना केवळ अंत्योदय शिधापत्रिका असलेल्या कुटुंबातील महिलांसाठीच लागू आहे. लाभार्थी महिलांनी रेशन दुकानात जाऊन ई-पॉस मशीनवर अंगठा ठेवल्यानंतर त्यांना एका कार्डवर एक साडी दिली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी गायकवाड यांनी दिली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment