सराफ लूट प्रकरण : दोन किलो चांदी, २० ग्रॅम सोने जप्त
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ फेब्रुवारी २०२२ । एरंडोल तालुक्यातील माळपिंप्री येथील सोन्या-चांदीचे व्यापारी राजेंद्र विसपुते यांच्यावर प्राणघातक हल्ला करून, त्यांच्याकडील एकूण ८ लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी २ किलो चांदी आणि २० ग्रॅम सोने जप्त केले आहे.
या लूट प्रकरणातील एक संशयित आकाश उर्फ धडकन सुरेश सपकाळे अद्याप पसार आहे. जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखा व एरंडोल पोलिस त्याचा शोध घेत आहेत. २१ रोजी चारही संशयितांची पोलिस कोठडीची मुदत संपली. त्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायमूर्ती विशाल घोडगे यांनी चौघांना २४ पर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली. उर्वरित सोने व चांदी तसेच घटनेच्या वेळी वापरलेली पिस्तुल व चाकू जप्त करण्यासाठी त्यांना कोठडी सुनावली. तसेच पसार संशयितासह आणखी काही नवीन संशयितांना अटक होण्याची शक्यता आहे, असे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव सांगितले. अनिल पाटील, पंकज पाटील करत आहेत.
- मुंबई-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात अमळनेरच्या दाम्पत्याचा मृत्यू
- सावद्यात लाखो रुपयांचा अवैध गुटखा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- जळगावात मांजा विक्रीसह वापर करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; ८ जण ताब्यात
- Jalgaon : शेतीतून उत्पन्न नाही, कर्जफेडीची चिंता, घरात कोणी नसताना शेतकऱ्याने उचललं धक्कादायक पाऊल
- जळगावात नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दोन युवकांवर गुन्हा दाखल