जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२३ । जर तुम्ही शिरागड येथील श्री सप्तश्रुगी देवीच्या दर्शनासाठी जाण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तापी व मानकी नदीच्या संगमा जवळ असलेल्या शिकागो निवासिनी श्री सप्तश्रुगी देवीच्या मंदिरा जवळ दरड कोसळल्याने मंदिरापर्यंत येणारा कोळन्हावी मार्गे रस्ता बंद करण्यात आला आहे.

दरम्यान, शिरागड येथील श्री निवासीनी सप्तश्रुगी देवी संस्थाने पर्यायी मार्ग सांगितला आहे. भावीकांनी साकळी मनवेल मार्गे शिरागड या रस्त्याने प्रवाश करुन दर्शनासाठी यावे, असं म्हटलं आहे.
शिरागड निवासिनी सप्तश्रुगी देवीचा लहानगड म्हणून भाविकांची श्रद्धा आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वी मोठा पुर आल्याने कोळन्हावी गावाहुन देवीच्या मंदिराजवळच्या रस्ता व मंदिरातून नदीकडे जाणाऱ्या रस्त्याची डोंगर दरड कोसळल्याने मंदिरात दर्शन करीता येणाऱ्या भावीकांचे हाल होत आहे.
रस्त्याचे काम संस्था मार्फत दुरुस्त करण्यात येत असल्यामुळे संस्थाने ५ दिवस कोळन्हावी मार्गे शिरागड येथे दर्शनासाठी येणारा रस्ता बंद ठेवला आहे. भावीकांचे दर्शना करीता साकळी मनवेल मार्गे शिरागड या रस्त्याने प्रवास करावा असे आवाहान संस्थेचे पदाधिकारी योगराज सोळंके, सरपंच योगीता सोनवणे, प्रताप सोनवणे, शांताराम सोळंके, पो.पा.सुधाकर सोळंके यांनी केले आहे.