सोमवार, डिसेंबर 11, 2023

संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा उत्साहात साजरा

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२३ । नामविश्व शिंपी समाज फाउंडेशन तर्फे आज संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यात आला या प्रसंगी समाजातील 50 ज्येष्ठ महिला आणि 50 शालेय विद्यार्थी यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी जळगांव शहराचे आमदार राजू मामा भोळे, नगरसेवक सचिन पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव शिंपी, उद्योजक प्रमोद शिंपी, किशोर शिंपी, मनोज देवरे, जयेश गवांदे, संदिप सोनवणे, मधुकर निकम ,संस्था अध्यक्ष बाळकृष्ण देवरे, महिला अध्यक्ष सारिका शिंपी, उपस्थित होते,

विद्यार्थ्यांना प्रोस्थाहन देऊन त्यांची शैक्षणिक प्रगती उंचावी या उद्देशाने त्यांना समाजाच्या व्यासपीठावर पुरस्कार देण्याचे नियोजन करण्यात आले होते. इयत्ता पहिली ते सहावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या 50 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, वह्या, आणि दप्तर देऊन त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रॉस्थाहन देण्यात आले तर समाजातील 50 ज्येष्ठ मातृ शक्तींना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.युदिश खैरनार यांनी सूत्र संचालन केले आभार प्रदर्शन संस्था सचिव भूषण निकम यांनी केले. समाजासाठी हिरीरीने कार्य करणाऱ्या राकेश जगताप यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

संस्था अध्यक्ष बाळकृष्ण देवरे यांनी प्रास्ताविक करताना संस्थेची भूमिका मांडली भविष्यात रोजगार मेळावा आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला, प्रमुख अतिथी राजू मामा भोळे यांनी भाषणात संत नामदेव महाराज यांचे जीवन कार्या बद्दल माहिती दिली नमविश्र्व संस्थेने शालेय विद्यार्थी आणि माता भगिनींना व्यासपीठावर जो सन्मान दिला हे खूप कौतुकास्पद कार्य आहे त्या बद्दल संस्थेचे कौतुक केले.

आमदार राजुमामा भोळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले. शिवकॉलनी येथील गणपती मंदिराच्या प्रांगणात साजरा झालेल्या संजीवन समाधी सोहळ्यास 1500 समाज बांधवांनी सहभाग नोंदवला. संजीवन समाधी सोहळा यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष मुकेश सोनवणे, संदिप जगताप, योगेश सोनवणे, निलेश सोनवणे, हरीश सोनवणे, निलेश जगताप, शामकांत जगताप, पंडितराव सोनवणे, गौरव शिंपी, जिग्नेश सोनवणे,शरद कापडणे, राकेश जगताप, रतीलाल शिंपी, यश शिरसाठे, निनाद शिंपी, यश जाधव, योगेश देवरे, राहुल शिंपी, सुनील गांगुर्डे, आशिष मांडगे, रुपेश जगताप, योगेश शिंपी, बाळकृष्ण कापुरे, शरद कापडणे, आणि एकता शिंपी समाज फाउंडेशन तसेच नामदेव संस्कार फाउंडेशन चे सहकार्य लाभले.