⁠ 
बुधवार, जून 26, 2024

संत मुक्ताईची पालखी आज करणार पंढरपूरकडे प्रस्थान, येथे होईल मुक्काम?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२४ । खानदेशातील मानाची पालखी म्हणून ओळख असलेल्या संत मुक्ताईची पालखी आज मंगळवारी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या पालखी सोहळ्याचे 315 वे हे वर्ष असून आज या पालखी सोहळ्यानिमित्त मंदिरात खजुरांची सजावट मुक्ताईच्या मूर्तीला करण्यात आली होती. खानदेशातील एकमेव मानाची पालखी म्हणून ओळखली जाते मुक्ताईनगर येथून ही पालखी पंढरपूरकडे आज प्रस्थान करणार आहे. 22 दिवसाचा प्रवास करत ही पालखी 14 जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचणार आहे. मुक्ताई पालखी हे खानदेशातील मानाची पालखी म्हणून ओळखले जाते.

संत मुक्ताईंच्या पादुका पालखी सोहळ्यात दरवर्षी हजारोंच्या संख्येने वारकरी व अनेक दिंड्या सहभागी होतात. मुक्ताईसंत मुक्ताई आषाढी वारी पालखी सोहळा जळगाव, बुलडाणा, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर या सहा जिल्ह्यांमधून प्रवास करतो, ६०० किमी एवढा सर्वात लांब प्रवास करून आषाढी वारीसाठी पंढरपुरात दाखल होणारा हा एकमेव पालखी सोहळा आहे.

गतवर्षी ही संख्या पंधरा दिंड्या व पंधराशे वारकरी अशी होती. यंदा दोन हजारांवर वारकरी सहभागी होऊ शकतात. सोहळ्याच्या २७ दिवसांच्या प्रवासात वारकऱ्यांची भोजन, चहा-नाष्ट्याची सोय हे दुपारचे थांबे असलेली गावे व रात्री मुक्कामाची गावे करतात. आषाढी वारीत सहभागाचे आवाहन मुक्ताई संस्थांनचे अध्यक्ष रवींद्र पाटील, पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराजांनी केले आहे.

येथे होईल मुक्काम
मुक्ताईनगर येथील नवीन मंदिरात पहिला मुक्काम होईल. यानंतर अनुक्रमे मलकापूर, मोताळा, बुलडाणा, येळगाव, चिखली, भरोसा फाटा, देऊळगाव माही, देऊळगाव राजा, जालना, काजळा फाटा, अंबड, वडीगोत्री, गेवराई, पाडळशिंगी, बीड माळीवेस, बीड बालाजी मंदिर, बानगाव फाटा, पारगाव, वाकवड, भूम, जवळा, शेंद्री, माढा, आष्टीचा मुक्काम. नंतर पंढरपूर.