संजय राऊत आम्हा प्रेतांच्या मतावरच तुम्ही निवडून आलात : राजीनामा द्या
जळगाव लाईव्ह न्युज । २८ जून २०२२ । प्रेतांच्या जीवावर तुम्ही राज्यसभेवर निवडून आला असाल तर आधी राजीनामा द्या. प्रेतांच्या मतदानावर राज्यसभेत पाऊल ठेवताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे, असं खुलं आव्हान एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी संजय राऊतांना दिलं आहे.
शिवसेना आमदारांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकारवर संकटाचे ढग घिरट्या घालत आहेत. शिंदे गटात शिवसेनेचे जवळपास ४० आमदार असल्याने राज्य सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी दगाबाजी केलेले सर्व आमदार जिवंत प्रेतं आहेत, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. गुवाहटीतून ही प्रेतं इथे महाराष्ट्रात येतील अस संजय राऊत म्हणाले होते, यार दीपक केसरकर यांनी उत्तर दिले.
दीपक केसरकर यांनी संजय राऊतांनी केलेल्या टीकेचे उत्तर तशीच टीका करून दिले. यावेळी केसरकर म्हणेल कि, प्रेतांच्या मतदानावर राज्यसभेत पाऊल ठेवताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे, अजून तुम्ही शपथ घेतलेली नाही, राजीनामा द्या. तुमच्याबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मागे राहिलेले काही शिवसैनिक आहेत. त्यांच्या मतावर निवडून या. नंतर आमच्यावर टीका करा. नैतिक अधिकार पाहिजे. काय बोलताय तुम्ही…. ?