भगवा फडकवत संजय राऊत झाले ईडीच्या स्वाधीन
जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२२ । शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे.यावेळी संजय राऊत यांनी भगव मफलर फडकवत मी लढतच असा इशारा दिला. पहाटे ईडीच्या पथकाने संजय राऊत यांच्या घरी धाड टाकली होती. तब्बल सडेनऊ तास कसून चौकशी केल्यानंतर ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले आहे. संजय राऊत यांचा दादरचा फ्लॅट ईडीने सील करण्यात आला आहे. संजय राऊत यांच्या समर्थनार्थ राऊत यांच्या घराबाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
संजय राऊत यांना पुढील चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेण्यात आले. त्यामुळे संजय राऊत यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडक बंदोबस्त करण्यात आला होता. शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले होते. यावेळी सर्वच कार्यकर्ते संजय राऊत यांचा जयघोष केला. यावेळी संजय राऊत यांना मुद्दामून अडकवले असा आरोप शिवसैनिकानीं केला.
यावेळी संजय राऊत यांची ईडीने तब्बल साडे नऊ तास कसून चौकशी केली मगच त्यांना ताब्यात घेतले. सिद्धार्थ नगर गोरेगाव, मुंबई येथे आहे. त्याला पत्रा चाळ असेही म्हणतात. पत्रा चाळ 47 एकरात पसरलेली आहे. पत्रा चाळच्या पुनर्विकासात झालेल्या हेराफेरीची ईडी चौकशी करत आहे. 2008 मध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) पत्रा चाळीच्या पुनर्विकासाचे काम सुरू केले होते. त्यात 672 भाडेकरू होते. पुनर्विकासाचे कंत्राट गुरु आशिष कन्स्ट्रक्शन लिमिटेडला देण्यात आले होते. 14 वर्षांनंतरही भाडेकरू आपली घरे परत मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. फ्लॅट न बांधता ही जमीन नऊ बिल्डरांना ९०१.७९ कोटींना विकल्याचा आरोप आहे. बांधकाम कंपनीने असे करून बेकायदेशीरपणे 1,034.79 कोटी रुपये कमावले.असा आरोप राऊत यांच्यावर आहे.