महाराष्ट्रराजकारण

संजय राऊतांनी अमित शहांना धु धु धुतल : आमच्यासाठी जे चक्रव्यूह निर्माण केलं, त्यात तुम्हीच अडकलेले आहात म्हणत.. !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२३ । भाजपचे नेते अमित शाह यांची नुकतीच नांदेड येथे सभा झाली. या सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शहा यांनी चार प्रश्न विचारले. उद्धव ठाकरे यांनी या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असं आव्हानच अमित शाह यांनी दिलं होतं. याला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शाह यांना चोख उत्तर दिलले आहे

.यावर बोलतांना संजय राऊत म्हणाले कि, आम्ही या चारही मुद्द्यावर आधीच भूमिका मांडली आहे. आमची भूमिका जगजाहीर आहे,शिवसेनेवर बोलताना अमित शाह यांनी शिवसेनेच्या इतिहासाचा अभ्यास करावा,

तीन तलाकला आम्ही पाठिंबा दिलेला आहे. 370 कलमवर आम्ही संसदेत भाजपला जाहीरपणे पाठिंबा दिला आहे. जात आणि धर्माच्या आधारावर आरक्षण असता कामा नये आणि आर्थिक आरक्षणावर आरक्षण असावं ही बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती. तीच भूमिका आमची कायम आहे, असं सांगतानाच शिवसेनेवर बोलताना राजकीय इतिहासाचा अभ्यास करूनच बोललं पाहिजे. अयोध्येत आम्हीही होतोच.

कोणते प्रश्न तुम्ही विचारत आहात? तुम्ही गोंधळलेले आहात. आमच्यासाठी जे चक्रव्यूह निर्माण केलं, त्यात तुम्हीच अडकलेले आहात. तुमचा अभिमन्यू होताना आम्हाला दिसतोय, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला.

Related Articles

Back to top button