⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

संजय राऊतांच्या सुटकेनंतर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया, काय म्हणाले वाचा..

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२२ । पत्राचाळ घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना पीएमएलए कोर्टाने आज जामीन मंजूर केलाय.त्यांनतर अनेक नेते मंडळींनी प्रतिक्रिया दिली. अशातच शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली.

काय म्हणले गुलाबराव पाटील?

“ही न्यायालयीन प्रक्रिया आहे आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये एखाद्या आरोपीला अटक होणे आणि जामिनावर सुटणे हा न्यायालयाचा भाग असतो”, असं गुलाबराव पाटील म्हणाले. तसेच “संजय राऊतांना अटक का झाली होती? ती कोणत्या कारणास्तव झाली हे आपल्या सगळ्या जगाला माहिती आहे. त्यांची सुटका झाली म्हणून त्यांच्या पक्षाच्या लोकांना आनंद होणे, त्यातून जल्लोष होणं हे स्वाभाविक आहे”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

“कोणत्याही पक्षातला माणूस एखाद्या वेळेस कारागृहामध्ये गेला आणि जर त्याची जामिनावर सुटका झाली तर पक्षातील सर्वांना आनंद होत असतो”, असं गुलाबराव म्हणाले.