---Advertisement---
बातम्या

Sanjay Raut : आता बंडखोरात होणार बंडखोरी, काही आमदार आमच्या संपर्कात

---Advertisement---

sanjay raut

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जून २०२२ ।एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत शिवसेनेचे ४० आमदार घेऊन गुहाटीत बसले आहेत. यामुळे महाराष्ट्र्रातील महाविकास आघाडी सरकार हे अस्थिर झाले आहे. मात्र यात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक मोठे विधान केले आहे. ते म्हणाले कि, आता बंडखोरात बंडखोरी होणार आहे. काही आमदार अजूनही आमच्या संपर्कात असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी आम्हालाही रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये कार्यक्रमासाठी 40 खोल्या लागत होत्या. त्याबाबत आम्ही हॉटेल व्यवस्थापनाला मेल केला आहे. मात्र अद्यापही मेलला उत्तर आले नाही, असे म्हणत आसामच्या मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. अडीच वर्ष मलाईदार खाती होती तेव्हा अन्याय आठवला नाही का?, असा सावलही यावेळी राऊतांनी उपस्थित केला आहे.

यावर बोलताना राऊत यांनी म्हटले की जरा संयम ठेवा, बंडखोरांमध्ये देखील बंडखोरी होऊ शकते. बंडखोर आमदारांपैक काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. माझं बंडखोर आमदारांना आव्हान आहे की त्यांच्यामध्ये धमक असेल तर त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यावेत आणि पुन्हा निवडणूक लढावी. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. अडीच वर्ष मलाईदार खाती होती, तेव्हा अन्याय आठवला नाही का असा सवाल राऊतांनी केला आहे. बाळासाहेबांचे भक्त आहोत असे सांगून पाठीत खंजीर खुपसला,


संजय राऊत यांनी सामनामधील रोखठोक या सदरातून देखील बंडखोरांवर निशाणा साधला आहे. फुटिरांबरोबर सरकार बनवणे म्हणजे अस्वलाच्या गुदगुल्या ठरतील. यावेळी ते म्हणले कि, राणे, भुजबळ मुख्यमंत्री झाले नाहीत तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे होणार ? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. या बंडखोर आमदारांना भाजपाचीच साथ आहे. भाजप जर मदत करत नसते तर हे आमदार पहिल्यांदा सुरतला गेलेच नसते. सुरतवरून त्यांना स्पेशल विमानाने आसाममध्ये नेण्यात आले. आसाममध्ये देखील भाजपाचेच सरकार आहे. आसाममध्ये भाजपाने या आमदारांची व्यवस्था केली, असा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---