जळगाव जिल्हा
संजय कोटेचा याची राष्ट्रीय जैन संघावर बिनविरोध निवड
जळगाव लाईव्ह न्यूज । बोदवड येथील श्री जैन संघाचे उपाध्यक्ष संजय ताराचंद कोटेचा यांची ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फ्रेंस दिल्लीच्या 2025 ते 2027 साठी होणाऱ्या कार्यकारिणी निवडणूकसाठी जैन एकता ग्रुप आणि जय जिनेन्द्र ही दोन पँनल अमोरा समोर उभी होती.
यामध्ये आपसात समन्वय झाला आणि एकता ग्रुपचे 21उमेदवार बिनविरोध झाले यात महाराष्ट्र झोन चार साठी जिल्ह्यातून दुसऱ्यांनदा व बोदवड शहरातून प्रथमच संजय ताराचंद कोटेचा याची बिनविरोध निवड झाली बोदवड सारख्या छोट्या गावाला प्रथमच संधी मिळाली असल्याने कोटेचा याचे अभिनंदन समाजाच्या वतीने करण्यात आले
तसेच याच ग्रुपचेअतुल जैन दिल्ली याची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली निवडणूक प्रक्रिया बिनविरोध होण्यासाठी अशोक बोरा अहील्यानगर(अहमदनगर) गणेश सांखला नाशिक याचे मोलाचे योगदान लाभले.