⁠ 
बुधवार, मे 1, 2024

मुक्ताईनगरात दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या ८ जणांना अटक

जळगाव लाईव्ह न्यूज। २५ ऑगस्ट २०२३। गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह दीड लाखांच्या मुद्देमालासह दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या ८ जणांना मुक्ताईनगर पोलिसांनी बुधवारी (ता. २३) रात्री सापळा रचून अटक केली. संशयितांची कारही ताब्यात घेण्यात आली. पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून त्यांनी नाकाबंदीस असलेले पोलिस उपनिरीक्षक राहुल बोरकर, पोलिस कर्मचारी विनोद सोनवणे, संदीप खंडारे, धर्मेंद्र ठाकूर, संदीप वानखेडे, राहुल बेहनवाल, संदीप धनगर, रवींद्र धनगर, मंगल सोळंके, अमोल जाधव यांना बोदवड चौफुली येथे बोदवडकडून येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याची सूचना केली. त्या प्रमाणे पथकाने संशयित पांढऱ्या रंगाची इर्टिगा कार (एमएच ४६, ए ८५२१) थांबवली.

त्यातील संशयिताना पोलिस ठाणे येथे आणून त्यांची आणि वाहनाची झडती घेतली असता त्यांच्याकडे ६९ हजार ६५० रुपये रोख, तसेच ४० हजार रुपये किमतीचा एक गावठी कट्टा, तीन जिवंत काडतूस, सुरा, इर्टिगा कार, ६ मोबाईल, दोरी, दोन नंबर प्लेट असा मुद्देमाल आढळून आला.या प्रकरणी संशयित मुकेश फकिरा गणेश (वय ४२), शेख भुरा शेख बशिर (वय ३८, दोन्ही रा. शहापूर, जि. बऱ्हाणपूर), शेख शरीफ शेख सलीम (वय ३५, रा. इच्छापूर, जि. बऱ्हाणपूर), शाहरुख शहा चांद शहा (वय २०, रा. आगननाका, उज्जैन), अज्जू ऊर्फ अझरुदीन शेख अमिनुद्दीन (वय ३६, बऱ्हाणपूर), अंकुश तुळशीराम चव्हाण (वय २०, रा. खापरखेडा, जि.बऱ्हाणपूर), खजेंदरसिंग कुलबिरसिंग रिनब (वय ४०, रा. लोधीपुरा, बऱ्हाणपूर), शेख नईम शेख कय्यूम (वय ४५, रा. शहापूर, बऱ्हाणपूर) यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक मोहिते तपास करीत आहे.

ही कारवाई निरीक्षक मोहीते, सहायक निरीक्षक संदीप दुनगहू, उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, उपनिरीक्षक राहुल बोरकर, पोलिस कर्मचारी विनोद सोनवणे, संदीप खंडारे, धर्मेंद्र ठाकूर, संदीप वानखेडे, राहुल बेहनवाल, संदीप धनगर, रवींद्र धनगर, मंगल सोळंके, अमोल जाधव यांनी केली आहे