जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जानेवारी २०२२ । महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अधिवेशन नुकतेच ठाणे येथे पार पडले. त्यात एरंडोल येथील तालुकाध्यक्ष संजय नारायण चौधरी यांचा सन्मान करण्यात आला.
सविस्तर असे की, मुंबई येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सोळावे राज्यस्तरीय अधिवेशन ठाणे येथील गडकरी रंगायातन सभागृहात प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या अधिवेशनात एरंडोल तालुक्यातील संघाचे तालुकाध्यक्ष संजय नारायण चौधरी यांना कोरोना काळात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. यावेळी अधिवेशनाचे उद्घाटन केंद्रिय गृहराज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते झाले.
अधिवेशनात मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, सरचिटणीस विश्वासराव आरोटे, पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील, धडक कामगार युनियनचे अध्यक्ष अभिजीत राणे, कार्याध्यक्ष राकेश टोळ्ये, मनिष केत, नितीन जाधव, किशोर पाटील, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे, खान्देश विभाग प्रमुख किशोर रायसाकडा, कोकण विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे यांच्यासह सर्व विभागीय अध्यक्ष व राज्यातील पाचशेपेक्षा जास्त पत्रकार उपस्थित होते. यावेळी एरंडोल संघाचे तालुकाध्यक्ष संजय चौधरी यांनी कोरोना काळात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल तसेच एरंडोल ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीवर आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रतिनिधी म्हणून सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल केंद्रीय गृहराज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी मराठी पत्रकार संघाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दीपक सपकाळे, कमलेश देवरे, जगदीश सोनवणे, ज्ञानेश्वर गुरव, भूषण महाजन, चेतन निंबोळकर, विकी खोकरे, विलास ताठे, संतोष नवले, योगेश सैतवाल, राहुल इंगळे, नागराज पाटील आदी उपस्थित.
हे देखील वाचा :
- आज धनत्रयोदशी! जाणून घ्या पूजाविधी आणि शुभ मुहुर्त..
- उत्तर महाराष्ट्रातून लोकमत खान्देश पॉलिटिकल आयकॉन पुरस्काराने अमोल शिंदे सन्मानित
- जळगावच्या ज्येष्ठ नागरिकांना आता कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेण्याची संधी, ६ ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज
- दहाव्या अजिंठा वेरूळ आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मानद अध्यक्षपदी प्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची नियुक्ती
- ना.गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने 3 हजार वारकऱ्यांना पंढरपूर वारी