जळगाव जिल्हाजळगाव शहर

महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त पांझरपोळ येथे युवा प्रबोधन विभागातर्फे स्वच्छता मोहिम

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ फेब्रुवारी २०२२ । केरकचरा व घाणीमुळे शहराची सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्यही धोक्यात आल्याचे चित्र आहे. मात्र, आपणच पुढाकार घेतल्यास किमान आपल्या परिसराची स्वच्छता व आरोग्य अबाधित राहू शकते, असे उदाहरण शहरातील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विभागाच्या युवा प्रबोधिने कार्यक्रमातून घालुन दिले. श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक मार्ग ( दिंडोरी प्रणित ) युवा प्रबोधनविभागातर्फे महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त पांजरपोळ गोशाळा आणि परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

गौ मातेला हिंदु धर्मात अनन्य साधारण महत्व आहे. शिवाय गाय ही या भारतीय कृषीप्रधान अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे युवकांना गोमातेची सेवेतुन गाईंचे महत्त्व तरुण पिढीला कळावे, यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. तरुणींना गाईंच्या शेणाच्या गौरी कशा तयार होतात याच प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक देण्यात आले. या नाविन्यपुर्ण कार्यक्रमाला संपदा गौरखेडे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी शहरातील श्री स्वामी समर्थ केंद्रातील अनेक युवक सेवेकरींनी उपस्थिती लावली.

हे देखील वाचा :

Related Articles

Back to top button