---Advertisement---
गुन्हे यावल

उधारीचे पैसे मागितल्याने सांगवीत महिलेला मारहाण

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२२ । यावल तालुक्यातील सांगवी येथे उधारीचे पैसे मागण्यासाठी आलेल्या ३० वर्षीय महिलेला तिघांनी मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

jalgaon crime 1 3 jpg webp

सविता ज्ञानेश्वर भालेराव (३०, रा.किन्ही, ता.भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, त्यांची पती ज्ञानेश्वर यांनी सांगवी येथील ज्योती सुनील मेघे यांना घराच्या बांधकामासाठी उसनवार पैसे दिले होते मात्र हे पैसे परत मागण्यासाठी गेल्यानंतर सविता भालेराव यांना ज्योती सुनील मेघे व तिची सासू व जेठांनी या तिघांनी जबर मारहाण केली. मारहाणीत सविता भालेराव यांच्या डाव्या हाताच्या पंजावर, मनगटावर व कमरेवर जबर दुखापत झाला.

---Advertisement---

या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सांगवी येथील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक संदीप सूर्यवंशी करीत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---