सांगवी बु. येथील २८ वर्षीय विवाहिता बेपत्ता

मार्च 21, 2022 6:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील २८ वर्षीय प्रिती योगेश नेमाडे ही विवाहिता माहेरी जात असल्याचे सांगून घरातून निघाली होती. मात्र अद्यपही घरी न पोहचल्याने याबाबत यावल स्थानकात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

yogita nemade jpg webp

सांगवी बुद्रुक येथील रहिवाशी प्रिती नेमाडे या विवाहिता पती व दोन मुलांसह वास्तव्याला आहे. शनिवारी १९ मार्च रोजी सकाळी ८ वाजता अंजाळे ता. यावल येथे माहेरी जाते असून घरातून गेल्या. सायंकाळ पर्यंत त्या माहरी घरी न पोहचल्याने पती योगेश नेमाडे यांनी परिसरात शोधाशोध केली.

मात्र, ती कुठेच मिळून न आल्या नाही. दरम्यान, पती योगेश नेमाडे यांनी सोमवारी २१ मार्च रोजी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून खबर दिली. त्यांच्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. किशोर परदेशी करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now