जळगाव लाईव्ह न्यूज । २३ नोव्हेंबर २०२१ । गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करून जात असलेल्या ट्रॅक्टरचा तहसीलदार पाठलाग करीत होते. तहसीलदारांपासून पळ काढण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर शिवकॉलनीत एका रिक्षात घुसले.
गिरणा नदी पात्रातून वाळू उपसा करण्याच्या ठेक्याची मुदत कधीच संपलेली असताना देखील मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जातो. मंगळवारी तहसीलदार कारवाईसाठी गिरणा पात्राकडे गेले असता एक वाळूने भरलेले ट्रॅक्टर शहराच्या दिशेने येत होते. तहसीलदारांनी कारवाईसाठी ट्रॅक्टरचा पाठलाग सुरू केला.
कारवाईपासून बचावाच्या प्रयत्नात शिवकॉलनीजवळ भरधाव ट्रॅक्टर रिक्षा क्रमांक एमएच.१९.व्ही.३४४१ मध्ये घुसले. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.