⁠ 
सोमवार, डिसेंबर 2, 2024
Home | गुन्हे | वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने चक्क तहसीलदारांच्या वाहनाला दिली धडक

वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने चक्क तहसीलदारांच्या वाहनाला दिली धडक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२४ । जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांनी धुमाकूळ घातला असून अशातच एक धक्कादायक घटना समोर आलीय. गस्त घालत असतांना एका वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने तहसीलदार यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. यात सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. सदर वाहन हे जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात येत होते.

काय आहे प्रकार?
जळगावमधील बिबा नगर या ठिकाणी गुरुवारी आज सकाळच्या सुमारास ४ ते ५ तलाठी यांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर पकडले. हे वाहन जमा करण्यासाठी तलाठी यांनी तहसीलदार यांचे वाहन बोलाविले होते. तहसीलदार यांचे वाहन आल्यावर या ठिकाणहून ट्रॅक्टर जमा करण्यासाठी नेत होते. तेव्हा ट्रॅक्टर चालक हे वाहन पळवून घेऊन जात असतांना ट्रॅक्टरने तहसीलदार यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. सुदैवाने हि गाडी उलटी होता होता वाचली. या धडकेत कुणीही जखमी झाले नाही. हे ट्रॅक्टर जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आणले जात आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.