⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

राष्ट्रीय योगासन स्पर्धेत जळगावच्या रुद्राक्षी भावेची तीन सुवर्णाला गवसणी

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२१ । कलिंगा युनिव्हर्सिटी आणि इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी चॅम्पियनशिप २०२१-२२ ही राष्ट्रीय योगासन स्पोर्ट‌्स चॅम्पियनशिप स्पर्धा भुवनेश्वर, ओडिशा येथे ११ ते १३ नोव्हेंबर दरम्यान, पार पडली. या स्पर्धेत जळगावच्या रुद्राक्षी भावे हिने ज्युनिअर गर्ल्स ग्रुप या गटात तीन सुवर्णपदकांसह चषक पटकावला.

रुद्राक्षी हिने या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. तिने आर्टिस्टिक सोलो व आर्टिस्टिक ड्युएट या प्रकारांत सुवर्णपदक तर गर्ल्स टीम यामध्ये महाराष्ट्र सुवर्णपदक आणि चषक मिळवला. एकूण तीन सुवर्णपदके आणि चषक मिळवल्याने रुद्राक्षी आगामी खेलो इंडिया या स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.

ती सेवानिवृत्त आयकर आयुक्त प्रकाश नाईक यांची नात व प्रज्ञा नाईक यांची कन्या आहे. तिला ध्रुव ग्लोबलचे चेअरमन डॉ. संजय मालपाणी, मंगेश खोपकर, प्रवीण पाटील, स्वप्निल जाधव, माधुरी वाक‌्चौरे यांचे मार्गदर्शन लाभले. आगामी स्पर्धात ती यश मिळवणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.