जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२२ । एरंडाेल व पाराेळा तालुक्यातील १० प्रमुख रस्त्यांच्या कामासाठी एकूण २३ कोटी ३० लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तातडीने या कामांना सुरुवात करण्याचा सूचना आ.चिमणराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

मतदार संघातील या सर्वच १० रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली होती. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केलेली होती. याची आमदार चिमणराव पाटील यांनी त्वरीत दखल घेत शासनाकडे या संदर्भात पाठपुरावा करून या रस्त्यांना मंजुरी मिळवली आहे. दरम्यान, या कामात एरंडोल तालुक्यातील उत्राण ते भातखंडेकडे जाणारा रस्त्यासाठी एक कोटी, एरंडोल, गालापुर, ताडे, हनुमंतखेडे गावापर्यंतच्या रस्त्यासाठी साडेचार कोटी, भालगाव ते पातरखेड ते जळूपर्यंत रस्त्यासाठी चार कोटी, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहापासून ते कढोली गावापर्यंत रस्त्यासाठी १ कोटी ८० लाख, धुळपिंप्री, मालखेडा ते कासोदा गावापर्यंत रस्त्यासाठी तीन कोटी, खर्ची ते रिंगणगाव दरम्यान पुलाचे बांधकाम करण्यासाठी दीड कोटी व मालखेडा ते कासोदा दरम्यान पुलाचे बांधकाम करण्यासाठी दीड कोटी. तसेच पारोळा तालुक्यातील पारोळा शहरापासून ते शासकीय आयटीआय पुढे रस्त्याच्या कामासाठी एक कोटी, रताळे ते करमाड व शिरसमणी ते चोरवड येथे रस्त्याची सुधारणा करणे व शिरसमणी गावात पुलासाठी अडीच कोटी व देवगाव येथे पुलासाठी अडीच काेटी मंजूर झाले आहेत.
उर्वरित कामे पूर्ण करणार एरंडोल तालुक्यासाठी १७ कोटी ३० लाख व पारोळा तालुक्यासाठी ६ कोटी असे एकूण २३ कोटी ३० लाख रस्ते व पुलांच्या बांधकामासाठी मंजुर झाले आहेत. लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे. मतदार संघातील लवकरच उर्वरित कामे प्राधान्याने पूर्ण केली जातील, अशी माहिती आमदारांनी दिली.
हे देखील वाचा :
- १०व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे १५ ते १९ जानेवारी २०२५ दरम्यान आयोजन
- नव्या वर्षात कोणता सण कोणत्या तारखेला? वाचा सणांच्या तारखांची संपूर्ण यादी
- यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांना जाहीर
- आज धनत्रयोदशी! जाणून घ्या पूजाविधी आणि शुभ मुहुर्त..
- उत्तर महाराष्ट्रातून लोकमत खान्देश पॉलिटिकल आयकॉन पुरस्काराने अमोल शिंदे सन्मानित