⁠ 
शनिवार, एप्रिल 13, 2024

खुशखबर! रेल्वेत 9144 जागांसाठी भरती सुरु ; ITI चे उमेदवार अर्ज करू शकतात..

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । रेल्वेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भर्ती बोर्डाने ‘टेक्निशियन’ पदासाठी भरती जाहीर केली असून या भरतीची अर्ज प्रक्रिया आज म्हणजेच 9 मार्च 2024 पासून सुरु झाली आहे. अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. लक्ष्यात असू द्या 08 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही RRB Technician Bharti 2024

एकूण 9144 जागांवर ही भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या रिक्त पदांपैकी 1092 पदे टेक्निशियन ग्रेड-1 सिग्नलची आहेत आणि 8052 पदे टेक्निशियन ग्रेड-III ची आहेत.
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: B.Sc (Physics / Electronics / Computer Science / Information Technology/ Instrumentation) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट :
18 ते 36 वयोगटातील उमेदवार टेक्निशियन ग्रेड-1 च्या रिक्त जागेसाठी अर्ज करू शकतील. 18 ते 33 वर्षे वयोगटातील उमेदवार टेक्निशियन ग्रेड-III च्या रिक्त जागेसाठी अर्ज करू शकतील. एससी आणि एसटीला पाच वर्षांची आणि ओबीसींना तीन वर्षांची सूट मिळणार आहे.
परीक्षा फी : General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
इतका पगार मिळेल :
टेक्निशियन ग्रेड I सिग्नल – 29,200/-
टेक्निशियन ग्रेड III – 19,900/-
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा