जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । रेल्वेत सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. रेल्वे भरती मंडळाने नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीच्या (Undergraduate Posts) पातळीवरील ३,०५० पदांसाठी भरती जाहीर केली आहे. विशेष या भरतीसाठी बारावी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहे.

या भरतीसाठी उमेदवार २८ ऑक्टोबर २०२५ पासून अर्ज करू शकणार आहे. rrbapply.gov.in ला भेट देऊन अर्ज करता येईल. २७ नोव्हेंबर २०२७ (11:59 PM) पर्यंत अर्ज करता येणार आहे.

रिक्त पदाचे नाव :
1) कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक)- 2424
2) अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट – 394
3) ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट – 163
4) ट्रेन्स क्लर्क (लिपिक) – 77

शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण
पद क्र.2: (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
पद क्र.3: (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
पद क्र.4: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३० वर्षे आहे. वयाची गणना १ जानेवारी २०२६ पासून केली जाईल. अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गांना पाच वर्षांची वयोमर्यादेत सूट मिळेल, तर ओबीसींना तीन वर्षांची वयोमर्यादेत सूट मिळेल.
पगार : 19900-25500
अर्ज शुल्क
उमेदवारांनी अर्जासोबत विहित श्रेणीनुसार शुल्क भरणे आवश्यक आहे. शुल्काशिवाय तुमचा फॉर्म स्वीकारला जाणार नाही. अनारक्षित, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांना ₹५०० भरावे लागतील, तर सर्व श्रेणीतील एससी, एसटी, पीएच आणि महिला उमेदवारांना ₹२५० भरावे लागतील.
फॉर्म कसा भरायचा?
अर्जाची तारीख जाहीर होताच, RRB त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर NTPC UG भरतीसाठी अर्ज लिंक सक्रिय करेल.
त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी नोंदणी करावी लागेल.
दिलेल्या नोंदणी क्रमांकाचा वापर करून लॉग इन करा आणि आवश्यक माहिती एक-एक करून भरा.
शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, श्रेणी आणि पत्ता संबंधित तपशील भरा.
कागदपत्र विभागात तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
तुमच्या श्रेणीनुसार अर्ज शुल्क भरा आणि अंतिम फॉर्म सबमिट करा.
भविष्यातील संदर्भासाठी फॉर्म प्रिंट करायला विसरू नका.
या भरतीशी संबंधित इतर कोणत्याही माहितीसाठी, उमेदवार प्रादेशिक RRB वेबसाइटना देखील भेट देऊ शकतात.






