खुशखबर! रेल्वेत TTE होण्याची सुवर्णसंधी.. 8 हजार जागांसाठी होणार भरती

एप्रिल 21, 2024 3:04 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुमचेही रेल्वेत टीटीई बनण्याचे स्वप्न असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. भारतीय रेल्वेच्या रेल्वे भर्ती बोर्ड(RRB) प्रवासी तिकीट परीक्षक (TTE) पदांसाठी भरती करणार आहे. या भरतीद्वारे 8000 हुन अधिक जागा भरल्या जातील. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. RRB TTE Recruitment 2024

RRB Bharti jpg webp

अर्जाची प्रक्रिया मे 2024 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा असून ती जून 2024 मध्ये संपणार आहे. परीक्षेची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट indianrailways.gov.in ला भेट देऊन माहिती घेऊ शकतात. RRB Bharti

पदाचे नाव : प्रवासी तिकीट परीक्षक
शैक्षणिक पात्रता
उमेदवारांनी दहावी किंवा बारावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा मान्यताप्राप्त बोर्डातून डिप्लोमा पूर्ण केलेला असावा.
वयोमर्यादा : किमान वय – 18 वर्षे
कमाल वय – 28 वर्षे
पगार : रु. 27,400 ते रु. 45,600 असा अपेक्षित आहे.

कशी असेल निवड प्रक्रिया?
लेखी परीक्षा
शारीरिक चाचणी
वैद्यकीय चाचणी
अर्ज फी
सामान्य आणि ओबीसी श्रेणींसाठी: रु. 500
अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गासाठी: रु. 300
अर्ज कसा करावा
पहिल्यांदा indianrailways.gov.in या वेबसाईटला भेट द्या
त्यानंतर latest ऑप्शनवर गेल्यानंतर Railway TTE recruitment 2024 सर्च करा
Railway TTE recruitment Section मध्ये Apply Online link क्लिक करा
येथे सर्व माहिती भरावी लागेल आणि पुढील बटणावर (Next Button) क्लिक करा
आकारानुसार तुमचा फोटो आणि अंगठ्याचे ठसे अपलोड करा
पुढील पेजवर, तुम्ही फी जमा करा आणि तुमची तारीख सेव्ह करा आणि तुमचा फॉर्म सबमिट करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now