जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२५ । दिवाळी काळात रेल्वे गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी दिसून येत आहे. परंतु यातच कर्जत यार्ड पुनर्रचना कामासाठी मध्य रेल्वेने ११ ते १४ ऑक्टोबरदरम्यान ब्लॉक घेतल्यामुळे जळगाव मार्गे धावणाऱ्या चार गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

भुसावळ- जळगाव मार्गे चार रेल्वे गाड्या वळवण्यात आल्या आहेत. यात जोधपूर हडपसर एक्स्प्रेस ही गाडी उधना – जळगाव – मनमाड – दौंड कॉर्ड लाईन मार्गे धावेल. ग्वाल्हेर – दौंड एक्स्प्रेस ही गाडी उधना नंदुरबार – जळगाव -मनमाड दौंड मार्गे धावेल. मैसूर अजमेर विशेष गाडी मिरज -पंढरपूर कुर्दुवाडी दौंड -मनमाड – जळगाव – नंदुरबार मार्गे, तर मिरज – हजरत निजामुद्दीन वातानुकुलीत गाडी दौंड – मनमाड जळगाव नंदुरबार मार्गे धावणार आहे. या गाड्यांचे वळवलेले मार्ग मनमाड – जळगाव – नंदुरबार मार्गे भुसावळ विभागातून जात आहे.









