जळगाव लाईव्ह न्यूज । ६ नोव्हेंबर २०२४ । जामनेर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप खोडपे यांच्या प्रचारार्थ सभेत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गिरीश महाजन यांना संकट मोचक नेते म्हणून संबोधलं जातं. मात्र ते संकट कोणाचा सोडवतात? तर देवेंद्र फडणवीस यांचं असं म्हणत तुमचे वजन आहे. मग का म्हणून शेतकऱ्यांना अनुदान आलं नाही. सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तुमची वजन का वापरत नाहीत, असंही रोहित पवार म्हणालेत.
काय म्हणाले रोहित पवार?
गिरीश महाजन आमदार झाले, मंत्री झाले. मात्र, मंत्री झाल्यानंतर त्यांनी तुमच्यासाठी काय केलं. मोठी-मोठी खाती त्यांच्याकडे होती. जलसंपदा खातं त्यांच्याकडे होतं. मतदारसंघ शेतकऱ्यांसाठी सुजलाम सुफलाम झाला असता. काय विकास केला गिरीश महाजनांनी. आरोग्यामध्ये मोठं काम केल्याचं ते नेहमी सांगतात. मात्र, आरोग्याची सेवा देण्यासाठी बाहेर का घेऊन जातात याच ठिकाणी असे एखादी मोठा हॉस्पिटल का तयार झालं नाही, असाही टोला त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर लगावला आहे.
तुमच्या तालुक्यामध्ये गिरीश भाऊंनी काही उद्योग आणले का, डिग्री घेऊन तरुणांच्या हाताला काम नाही. सरकार महाराष्ट्र आयोगाच्या परीक्षांमध्ये सुद्धा मोठ्या भ्रष्टाचार करतात. तलाठी भरतीसाठी तर एकेक जणांकडून 35-35 लाख रुपये घेतले जात असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला आहे.