⁠ 
शनिवार, जून 15, 2024

रोहिणी खडसेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं प्रकरण काय?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२३ । ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावर येत असून यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी विविध मागण्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता.

या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालया बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात सुरू असलेल्या बैठकीतून जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्ष रोहिणी खडसे यांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली.

तसेच राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, रिकु चौधरी, मंगला पाटील,वंदना चौधरी यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांसोबत झटापट झाली.