जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑगस्ट २०२१ । माजी महसूलमंत्री राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांची कन्या व जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी आज राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांची मुंबई येथे भेट घेतली.

यावेळी रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील बोदवड परिसर उपसा सिंचन योजना, कुऱ्हा वढोदा इस्लामपुर उपसा सिंचन योजना, मुक्ताई उपसा सिंचन योजना, वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजना या अपुर्ण अवस्थेत असलेल्या उपसा सिंचन योजनांची आढावा बैठक घेऊन निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली.
यावर पाटील यांनी पुढील आठवड्यात उपसा सिंचन योजनांची आढावा बैठक घेण्यात येईल व निधीची उपलब्धता करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष, जि प सदस्य रविंद्र नाना पाटील, पं.स. सदस्य दिपक पाटील, रावेर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील उपस्थित होते.
दरम्यान, संत मुक्ताई साखर कारखान्यासाठी दिलेल्या कर्जाबाबत ईडीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नोटीस बजावली आहे. आधीच भोसरी जमीन व्यवहारप्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची ईडीकडून चौकशी सुरू असताना, त्यांची कन्या चेअरमन असलेल्या बँकेकडून ही माहिती मागविण्यात आल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.