⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर मतदारसंघात विकास हरवला – रोहिणी खडसे

मुक्ताईनगर मतदारसंघात विकास हरवला – रोहिणी खडसे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । मुक्ताईनगर मतदारसंघासात महायुतीचे सरकार आल्यापासून विकास कामांसाठी मोठा निधी दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगर येथील जाहीर सभेत सांगितले होते; परंतु मतदारसंघात कुठेच विकास झालेला दिसून येत नाही. मग एवढा निधी गेला कुठे असा प्रश्न जनतेला पडला असुन निमखेडी खुर्द हे गाव आमदारांनी विकसासाठी दत्तक घेतलेले गाव आहे इथे तरी झालेला विकास सापडेल अशी मला आशा होती परंतु इथे तर गाव अंतर्गत रस्ते, गटारी यांची दुर्दशा झालेली असून विकास नावालासुद्धा सापडत नाही आहे हजार कोटींचा निधी गेला कुठे? असा प्रश्न मुक्ताईनगर मतदारसंघांच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार ॲड. रोहिणी एकनाथराव खडसे यांनी निमखेडी खुर्द येथे प्रचारादरम्यान उपस्थित केला.

मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द येथे जनआशीर्वाद पदयात्रा काढून रोहिणी खडसे यांनी मतदारांचे आशीर्वाद घेऊन मतदारांशी संवाद साधत त्यांना मतदानरूपी आशिर्वाद देण्याची विनंती केली. यावेळी त्यांना मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी बोलतांना रोहिणी खडसे म्हणाल्या की, आ. एकनाथराव खडसे यांनी तीस वर्ष मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना, जातपात, पक्षीय मतभेद न करता सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून मतदारसंघातील खेडोपाड्यांचा विकास केला. त्यांच्या माध्यमातून निमखेडी खुर्द गावाला चहूबाजूंनी जोडणाऱ्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले गावात सामाजिक सभागृह, व्यायामशाळा, अंतर्गत रस्ते, गटार अशा अनेक मुलभूत सुविधांची कामे करण्यात आली.

भविष्यात गावात मुलभूत सुविधांच्या निर्माणाबरोबर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अद्यावत लायब्ररीचे निर्माण करेल, असा माझा शब्द असल्याचे सांगून, गावाचा मतदारसंघाचा गेल्या पाच वर्षात रखडलेला विकास मार्गी लावण्यासाठी आ.एकनाथराव खडसे, जेष्ठ नेते रवींद्र भैय्यासाहेब पाटील, अरूणदादा पाटील, राजाराम महाजन, उदयसिंह पाटील आणि जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली लढत असलेल्या या निवडणुकीत मतदानरुपी आशिर्वाद देण्याची रोहिणी खडसे यांनी ग्रामस्थांना विनंती केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस ईश्र्वर रहाणे, माजी सभापती निवृत्ती पाटील, सुवर्णाताई साळुंखे, रामभाऊ पाटील यांच्यासह ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.