अपना काम बनता, अभी भाड़ में जाए जनता! १.०५ कोटी लाडक्या बहिणींना अपात्र ठरवल्याबद्दल रोहिणी खडसेंचा हल्लाबोल

मार्च 11, 2026 3:12 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २०२४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना दरमहा १५०० रुपये मिळत आहे. मात्र आता या योजनेच्या पडताळणीत १ कोटी ५ लाख महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे. यावरूनच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

TP 1

रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारवर घणाघात केला. त्या म्हणाल्या, “आता विधिमंडळात महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण या विषयावर चर्चा सुरू असताना, सरकारने १.०५ कोटी लाडक्या बहिणींना अपात्र ठरवले आहे. हा किती दुटप्पीपणा आहे? २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योजना सुरू केली असताना परिस्थिती काय होती?”

सध्या संभाव्य पात्र लाभार्थी १,४८,६०,००० इतके शिल्लक राहिले असून, २०२६–२७ बजेटमध्ये या योजनेसाठी २६,५०० कोटी रुपये तरतूद करण्यात आले आहेत. रोहिणी खडसे यांनी आरोप केला की, निवडणुकीच्या वेळी शासनाने सर्व महिलांना पैसे दिले, निवडणुका जिंकल्या नंतर हळूहळू लाडक्या बहिणींवरचे प्रेम कमी केले गेले. त्यांनी या निर्णयाला “अपना काम बनता, अभी भाड़ में जाए जनता” असे बोधक टीका केली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now