चोरट्यांचा उच्छाद ! न्हावी येथे एकाच रात्री चार बंद घरे फोडली, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

जानेवारी 11, 2026 2:50 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात घरफोडीच्या घटना काही कमी होताना दिसत नसून अशातच यावल तालुक्यातील न्हावी येथे चोरट्यांनी एकाच रात्री चार बंद घर फोडून चोरी केल्याची घटना उघडकीस आलीय. मात्र, त्यात चोरट्यांच्या हाती फार काही लागले नसले तरी या घटनेनं परिसरामधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

nhavi

न्हावी गावातील दुगदिवी मंदिरासमोरील नेमिदास पाटील हे बाहेरगावी गेल्याने घर बंद आहे. चोरट्यांनी त्यांच्या घरातील ३ ते ४ ग्रॅमच्या कानातील सोन्याच्या साखळ्या लांबवल्या असे समोर आले. चावदस नगरमधील सुरेश पिंपळे यांचेही घर बंद चोरट्यांनी लक्ष केले. सेफ्टी दरवाजा व मेन दरवाजाचे कुलूप टॉमी टाकून तोडले. घरातील सामान अस्तव्यस्त फेकला. मात्र, हाती काहीही लागले नाही.

Advertisements

चावदस नगरसमोरील भोगे मळ्यातील विजय महाजन यांच्या दरवाजाचा कडी कोयंडा व आतील सेफ्टी कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. सर्व कपाटांचे लॉकर तोडून तपासणी केली. पण, चोरांच्या हातात काहीही लागले नाही.

Advertisements

याच परिसरातील वामन रामा इंगळे यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरटे आत शिरले. चांदीच्या दोन अंगठ्या व एक ओम पान घेऊन ते पसार झाले. सर्व चोऱ्या घर बंद असल्याने झाल्या. न्हावी येथील पोलिस पाटील संजय चौधरी यांनी फैजपूर पोलीस स्टेशन ही माहिती दिली. उपनिरीक्षक सय्यद, हवालदार सूरदास, भूषण ठाकरे, देवा पाटील यांनी घटनास्थळी पाहणी केली. नंतर तपास सुरू झाला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now