⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | गुन्हे | जळगाव शहरातील ज्वेलर्स दुकानावर दरोडा, लाखोंचा ऐवज पळविला, चोरटे CCTV कॅमेऱ्यात कैद

जळगाव शहरातील ज्वेलर्स दुकानावर दरोडा, लाखोंचा ऐवज पळविला, चोरटे CCTV कॅमेऱ्यात कैद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२४ । जळगाव शहरासह जिल्ह्यात घरफोडी, दरोडासह जबरी चोरीच्या घटना वाढताना दिसत असून चोरट्यांना खाकीचा धाकच उरलेला दिसत नाहीय. अशातच आता जळगाव शहरातील सराफ बाजारातील सौरभ ज्वेलर्सवर पहाटेच्या सुमारास दरोडा घालत लाखो रुपयांचे सोने लुटून नेल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान चोरटे CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

जळगाव शहरातील सराफ बाजारातील भवानी माता मंदिरा समोरील महेंद्र कोठारी यांचे सौरभ ज्वेलर्स दुकान आहे. या ज्वेलर्समध्ये सकाळी तीन वाजताच्या सुमारास सहा दरोडे खोरांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. यानंतर दुकानातील शो रूममधील लाखो रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केला आहे.

यावेळी दरोडेखोरांनी दुकानातील तिजोरी उघडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना यश मिळालं नाही. त्यामुळे कोट्यावधी रुपयांचे सोने बचावले आहे. मात्र दुकानातील जवळपास ४०० ग्रॅम वजनाचे सोने काढून नेल्याचा अंदाज आहे. दरोडे खोरानी दुकानात प्रवेश करण्यापूर्वी दुकाणा बाहेरील सुरक्षा रक्षकांना शस्त्राचा धाक देऊन आणि जिवे मारण्याची धमकी देत गप्प केल्याचे दुकान मालक सौरभ कोठारी यांनी म्हटल आहे शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

https://www.instagram.com/reel/C7L5rrLSAmM/?igsh=MTRxaHlsNWd4aDdjdA==
author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.