⁠ 
सोमवार, जुलै 22, 2024

रोडरोलर आणि दुचाकीचा अपघात, दुचाकीस्वार जखमी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑक्टोबर २०२२ । रावेर तालुक्यातील ऐनपुर येथून जवळच असलेल्या ऐनपुर- खिर्डी रस्त्यावर रोडरोलर आणि मोटर सायकल यांच्यात अपघात होऊन मोटर सायकल चालक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, दुचाकीस्वार जखमीला उपचारासाठी रावेर येथे हलविण्यात आल्याचे समजते.

शेखर गाढे (वय 46) असे जखमीचे नाव आहे. तालुक्यातील ऐनपुर येथील ऐनपुर- खिर्डी रस्त्यावर मोटर सायकल आणि रोडरोलर यांच्यात अपघात होऊन मोटरसायकल चालकाच्या डोक्याला तसेच इतर ठिकाणी मार लागून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला. तसेच जखमी मोटर सायकल चालकाला त्वरित ऐनपुर येथील युवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी ऐनपुर येथील जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले असता जखमी व्यक्तीला वैद्यकीय अधिकारी डॉ. सिद्धेश पाटील यांनी पुढील उपचारासाठी रावेर येथे रेफर केल्याचे समजते.