⁠ 
मंगळवार, सप्टेंबर 17, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ | भुसावळात शहरातील रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत

भुसावळात शहरातील रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२१ । भुसावळ शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरण कामांमध्ये गुणवत्तेशी तडजोड सहन केली जाणार नाही, असे सांगत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पालिकेच्या रस्ते डांबरीकरणाचे काम घेतलेल्या ठेकेदाराची कानउघाडणी केली. पावसाळा सुरू झाल्याने कामांना गती द्यावी, तातडीने नियेाजीत रस्ते पूर्ण करावे असेही खडसे यांनी सांगितले. दरम्यान खडसेंनी नगरसेवकांसोबत जळगावरोडवर सुरू असलेल्या डांबरीकरण कामाची पाहणी केली.

यांची होती उपस्थिती

यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे,  स्विकृत नगरसेवक प्रा.सुनील नेवे, पुरुषोत्तम नारखेडे, अ‍ॅड.बोधराज चौधरी, देवेंद्र वाणी, मुकेश पाटील, दिनेश नेमाडे, किरण कोलते, वसंत पाटील, शे.शफी, मुकेश गुंजाळ, महेंद्रसिंग ठाकूर, राज खरात, संदेश सुरवाडे, अनिकेत पाटील, विजय चौधरी, धजाज खान, अमोल इंगळे, पृथ्वीराज पाटील, उसामा खान, प्रशांत नरवाडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी शहराध्यक्ष धांडे विरोधक कसे?

जळगावरोडवरील पाहणी दरम्यान रस्त्यांच्या कामासंदर्भात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी तक्रार केली आहे? अशी विचारणा पत्रकारांनी केली. यावर खडसेंनी विरोधक तक्रार करणारच ते त्यांचे काम आहे, असे सांगितले. भाजपामध्ये सातत्याने अन्याय होत असलेले माजी मंत्री खडसे आता राष्ट्रवादीत आहे तर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे देखील त्यांच्याच पक्षात असताना विरोधक कसे? असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.